हस्तनिर्मित कला ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. प्रत्येक कलाकृती कलाकाराच्या हातातील कौशल्य, मेहनत आणि कल्पकतेचे प्रतीक असते. मशीनने तयार केलेल्या वस्तूंमध्ये भावना नसते, परंतु हस्तनिर्मित वस्तूंमध्ये कलाकाराची आत्मा सामावलेली असते.
आजही भारतातील अनेक कारागीर पारंपरिक पद्धतीने सुंदर कलाकृती तयार करत आहेत. या कलेमुळे आपल्या संस्कृतीचे जतन होते आणि स्थानिक कारागिरांना रोजगार मिळतो.
